दृष्टी आणि ध्येय
- स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मूलनाचे उपक्रम चालविणे.
- प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे.
- प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे.
उद्दिष्ट
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मूलनाचे उपक्रम चालविणे, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे, प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
कार्ये
- एकात्मिक व शाश्वत ग्रामीण विकास धोरण 2023-28 ची अंमलबजावणी
- महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाच्या पुढील उप-क्षेत्रांसाठी प्रतिसाद, अनुदान आणि कामकाजात देखरेख ठेवणे:
- केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.
- पंचायत राज व्यवस्थेच्या कामकाजात देखरेख ठेवणे
- उत्तरोत्तर कागदरहित कार्यालये साध्य करणे आणि विभागातील प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी सुयोग्य माहिती तंत्रज्ञान साधने उपल्बध करणे.
- विभागाद्वारे घेण्यात आलेल्या पुढाकारांची विविध माध्यमांतून प्रक्रियापणे माहिती प्रदान करणे.
- वेळोवेळी निश्चित केलेल्या ग्रामविकास मधील प्रमुख (फ्लॅगशिप) कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.
- ग्राम विकास विभागातील महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियाना अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी पथदर्शी, कौशल्यबद्ध, ऑनलाइन पोर्टलद्वारे आणि प्रदर्शनांना प्रोत्साहन देणे.